Ad will apear here
Next
लव्ह इन द टाइम ऑफ करोना
अतिशय कठोर असा पोलीस अधिकारी राणे, त्याच्या तुरुंगात अनेक गुन्हेगारांना करोनाची लागण झालेली असते. हे सगळे गुन्हेगार बरीच दीर्घ शिक्षा भोगत असतात. त्यातला एक गुन्हेगार बलात्काराच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतो. शिक्षेचा काही कालावधी शिल्लक असतो. अशा वेळी राणे त्याला ‘तुझी तुरुंगातून सुटका करतो’ असं सांगत त्याला बाहेरच्या जगात गेल्यावर दोन लाख रुपयेदेखील देण्याचं कबूल करतो. त्या बदल्यात त्यानं एका स्त्रीवर बलात्कार करायचा असतो. विशेष म्हणजे ही स्त्री दुसरी-तिसरी कोणी नसून राणेची सुंदर, देखणी अशी बायको असते. राणेला या बलात्कारानं आपल्या बायकोलाही करोना पॉझिटिव्ह करायचं असतं का? तसं असेल तर का? तिनं असं काय त्याचं घोडं मारलेलं असतं? तसंच हा बलात्कारी गुन्हेगार हा चांगला उच्चशिक्षित असताना बलात्काराची शिक्षा का भोगत असतो? त्यानं बलात्कार का केलेला असतो? शिवाय बलात्काराचा गुन्हाही कबूल केलेला असतो...

ही कथा हळूहळू आपली उत्कंठा वाढवत नेते... कथेतला हा नायक बलात्कार करण्यासाठी राणेनं दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो; मात्र तो तिच्यावर म्हणजे राणेच्या सुंदर बायकोवर बलात्कार करतच नाही. उलट तिला सत्य कथन करतो. तिथून त्याचा आणि तिचा प्रवास सुरू होतो. हजारो/लाखो लोक या काळात जसे स्थलांतर करत होते, करताहेत, अगदी तसाच. या प्रवासात काय घडतं, हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जातो, काय देऊन जातो, याची कथा म्हणजे ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना.’

या कथेच्या शेवटी आपणही नकळत गुणगुणू लागतो, निके निके चालन लागी...  रोहन प्रकाशनानं नुकताच प्रकाशित केलेला ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हा कथासंग्रह असून, यात गणेश मतकरी, नीरजा, श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश जयश्री मनोहर आणि हृषीकेश पाळंदे या लेखकांच्या करोना काळातल्या कथा आहेत. या पुस्तकाचं संपादन अनुजा जगताप हिनं केलं असून, मुखपृष्ठदेखील आल्हाददायक आहे.

आज मी या पुस्तकातली एकच कथा वाचलीय आणि ती आहे, श्रीकांत बोजेवार यांची ‘निके निके चालन लागी...’ ही कथा. नैया मोरी निके निके चालन लागी हे कबीराचं अतिशय अप्रतिम असं भजन आहे. हे भजन कुमार गंधर्व यांनी गायलंय. तसंच राहुल देशपांडे, भुवनेश कोमकली आणि इतर अनेक गायकांनी आपापल्या शैलीत अतिशय सुरेखरीत्या गायलं आहे. ही कथा करोनाच्या मरगळ आलेल्या काळात टवटवीत करून जाते! श्रीकांत बोजेवार यांचं ‘दीडदमडी’ वाचल्यानंतर आज ही कथा वाचली आणि खूप आवडली.

आता इतर कथा वाचण्याची उत्कंठा लागलीय.

- दीपा देशमुख, पुणे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PWQFCR
Similar Posts
हरित द्वीपाचा राजा नुकत्याच होऊन गेलेल्या बालदिनी सकाळी सकाळी पं. नेहरूंची अनेक भाषणं वाचली. लिखाणाची महत्त्वाची कामं आटोपली आणि मग ‘मनोविकास’निर्मित ‘हरित द्वीपाचा राजा’ हे सुनील गंगोपाध्याय या प्रख्यात बंगाली लेखकाचं पुस्तक वाचायला घेतलं.
एबारो बारो - सत्यजित रे कालपासून ‘एबारो बारो’ हा सत्यजित रे (राय) यांचा कथासंग्रह - ज्याचा अनुवाद विलास गिते यांनी केला आहे वाचत होते. ‘एबारो बारो’ म्हणजे आणखी बारा! साकेत प्रकाशनानं १९९२ साली प्रकाशित केलेला हा अनुवाद आजही तितकाच ताजा वाटतो.
नवं पुस्तक : नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर भीती, गूढता, अतार्किक जग, मनोव्यापार आदी गोष्टींचा समावेश असलेलं साहित्यातलं एक नवं दालन नारायण धारप यांनी वाचकांसाठी खुलं करून दिलं आणि त्यात वाचकांना गुंतवलं. अशा या लोकप्रिय लेखकाबद्दल प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेलं ‘नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर’ हे नवं पुस्तक बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे लवकरच प्रसिद्ध होत आहे
डायनासोरचे वंशज मी या पुस्तकानं झपाटून गेले, २०११ साली प्रकाशित झालेलं पुस्तक आपण अजूनपर्यंत वाचलं नव्ह.तं याचं खूप खूप वाईट वाटलं. मानसशास्त्राच्या अंगानं प्रवास करणाऱ्या या सगळ्या कथा एका अद्भुत विश्वात मला घेऊन गेल्या. या पुस्तकात एकूण १० कथा आहेत; पण एका दमात या कथा वाचता येत नाहीत. प्रत्येक कथा मेंदूला झिणझिण्या आणते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language